Rahul Gandhi : सुरत कोर्टानं राहुल गांधींची याचिका फेटाळल्याने राहुल गांधीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात राहुल गांधींना आता हायकोर्टात अपील करावं लागणारआहे. आमचा अजूनही न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हणत काँग्रेस उद्या हाय कोर्टांत धाव घेणार आहे.
2019 च्य़ा लोकसभेच्या निवडणूकी दरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. या शिक्षेच्या विरोधात सुरत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द व्हावी यासाठी दोन वर्षाची शिक्षा मुद्दाम देण्यात आल्याचे राहुल गांधी यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
खासदारकी गेली पुढे काय
राहुल गांधी आता बायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनीधी नसणार
राहुल गांधींना संसदेच्या कामकाजापासून दूर रहावं लागणार
कोर्टाचा दिलासा मिळाला नाही तर निवडणूक लढवण्यावरही निर्बंध घालण्यात येणार
सगळेच निर्णय विरोधात गेले तर राहुल गांधींना आठ वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.
राहुल गांधी यांची खासदारकी का गेली?
राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली
2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी प्रचार करताना वादग्रस्त विधान
सर्वच चोरांचं आडनाव मोदी कसं, हे विधान राहुल गांधी यांना भोवलं
कर्नाटकातील कोलारमधील सभेत वादग्रस्त वक्तव्य
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









