ऑनलाईन टीम/ तरुण भारत
“नवीन सरकार गोंधळलेले आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान होतोय आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान.त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे.त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यांनी राज्यातल्या राजकारणाबद्दल चिंता व्यक्त केली. पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभात सुळे बोलत होत्या.एकनाथ शिंदे हे बिचारे मुख्यमंत्री आहेत असेही त्या म्हणाल्या.
युतीचं सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीचीही चर्चा होऊ लागली आहे. पत्रकार परिषदेत ते शिंदेंना बोलताना मध्येच एकतर चिठ्टी देतात तर काहीवेळी माईक ओढून स्वत:चं बोलायला सुरुवात करतात. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. या संदर्भात सुप्रिय़ा सुळे यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा- केसरकरांनी शरद पवारांची जाहिर माफी मागितली; म्हणाले, ते माझे गुरु…
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, सध्या जे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राला न शोभणारं आहे.मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खूप काळजी वाटतेयं.त्यांना प्रॉम्प्टींग करणं,चिठ्ठी देणं अशा कृतीतून मुख्यमंत्र्यांना कमीपणा दाखवायचं काम उपमुख्यमंत्री करत आहेत.सध्या मी स्वतःच गोंधळात पडलेय कारण कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही असा टोलाही त्यांनी लगावला.