विधान परिषदेचे सदस्यत्व पुन्हा प्राप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी स्वत:चे विधान परिषद सदस्यत्व गमाविलेले राजद नेते सुनील सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने सुनील सिंह यांचे सदस्यत्व बहाल करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने कलम 142 चा वापर करत हा आदेश जारी केला आहे. याचबरोबर न्यायालयाकडुन आचार समितीची जारी अधिसूचनाही रद्द करण्यात आली आहे.
राजद नेते सुनील सिंह यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान नितीश कुमार यांची मिमिक्री केल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर संजद आमदाराच्या तक्रारीवर याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने स्वत:च्या अहवालात सुनील सिंह यांच्याकडून शिस्तभंग झाल्याचे म्हटले होते. यानंतर समितीच्या शिफारसीनुसार विधान परिषद सभापतींनी 26 जुलै रोजी सुनील सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. राजद नेत्याने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.









