नवी दिल्ली :
न्यूज क्लिकचे संपादक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी होणारी सुनावणी एक दिवसासाठी टाळली आहे. आता गुरुवारी म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. प्रबीर यांनी स्वत:च्या अटकेविरोधात याचिका दाखल केली आहे. न्यूज क्लिक या न्यूज पोर्टलवर चिनी दुष्प्रचार फैलावण्यासाठी रक्कम स्वीकारल्याचा आारेप आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस आणि सीबीआयकडून तपास केला जात आहे.









