Supreme Court : राजकीय पक्षांकडून वापरण्यात येणाऱ्या धार्मिक नावांच्या आणि चिन्हांच्या नावाबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर पावले उचलली आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला नोटीसही देण्यात आली आहे. राजकीय पक्षांकडून धार्मिक नावांचा आणि चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत यावर आक्षेप घेण्यात आला होता. न्यायालयाने अशा पक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी ही याचिकाकर्त्याने केली आहे.
वसीम रिझवी यांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. जर धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर असेल, तर पक्षाचे नावही धर्माच्या आधारावर असू शकत नाही, असे मत रिझवी यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि हिंदू एकता दल या पक्षांचे उदाहरण दिले आहे. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात सांगितले की, राजकीय पक्षांच्या भांडणात चंद्र ताऱ्यांचा वापर थांबवावा तसेच न्यायालयाने अशा पक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
Previous Articleडोक्यात दगड घालून निर्घृण खून; कोल्हापुरातील घटना
Next Article संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला








