पेपरलेस ग्रीन कोर्टरूम सुरू, वकिलांसाठी मोफत वायफाय, न्यायाधीशांच्या खंडपीठावर डिजिटल स्क्रीन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सहा आठवड्यांच्या उन्हाळी रजेनंतर पुन्हा सुरू झाल्यानंतर भारताचे सर्वोच्च न्यायालय ‘हायटेक’ झाल्याचे दिसून आले. उन्हाळ्याच्या सुटीमुळे बंद असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सर्व न्यायालयीन खोल्या हायटेक करण्याचे काम सुरू होते. सोमवार, 3 जुलैला न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही दालनांना नवी झळाळी दिसून आली. 1 ते 5 क्रमांकाची दालने पूर्णपणे पेपरलेस झाली आहेत. यासोबतच अनेक डिजिटल स्क्रीन, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, प्रगत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा येथे सुरू झाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या पाच कोर्टरुममध्ये पूर्णपणे पेपरलेस सुविधा देण्यात आल्या आहेत. आता न्यायनिवाड्याच्या पुस्तकांची जागाही डिजिटल लायब्ररीने घेतली आहे. कोर्टरूममध्ये मोठे एलसीडीही लावण्यात आले आहेत. वकिलांसाठीही हायटेक सुविधा आहेत. मशीनद्वारे न्यायाधीशांना कागदपत्रे दाखवता येतात. न्यायाधीशांना कायद्याच्या पुस्तकांऐवजी डिजिटल पद्धतीने विविध निवाडेही पाहता येणार आहेत. न्यायालय 1 ते 5 व्यतिरिक्त कॉरिडॉर, मीडिया रूम, वेटिंग रूम इत्यादीमध्ये वादक, वकील आणि प्रसारमाध्यमांसाठी वाय-फाय सुरू करण्यात आले आहे.
73 वर्षांच्या इतिहासात भारतीय न्यायव्यवस्था आता पूर्णपणे हायटेक होऊ लागली आहे. सर्वोच्च न्यायालयातील या हायटेक प्रारंभाकडे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा नवा उपक्रम म्हणून पाहिले जात आहे. न्यायालयीन कामकाज पेपरलेस व्हावे अशीही त्यांची इच्छा होती. न्यायालयांच्या चेंबरमध्ये मोठे एलसीडी बसविण्यात आले असून वकिलांसाठी हायटेक सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत. संगणकाद्वारे न्यायाधीशांना कागदपत्रे दाखवता येतात. न्यायाधीशांना कायद्याच्या पुस्तकांऐवजी डिजिटल पद्धतीने विविध निवाडेही पाहता येणार आहेत. येत्या काळात हळूहळू इतर न्यायालयांमध्येही ते दिसून येईल. कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी न्यायाधीशांकडे दस्तऐवज दर्शक तंत्रज्ञान उपलब्ध असणार आहे. कोर्टरूम हायटेक होण्याआधी दोन्ही बाजूला पुस्तके आणि कागदपत्रे ठेवण्यात आली होती. वकिलांना आत उभे राहण्यासाठी फारच कमी जागा होती. मात्र, ही पुस्तके व कागदपत्रे अन्यत्र हलविण्यात आली आहेत.









