नवी दिल्ली
दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून अन्य तुरुंगात हलविण्याची मागणी करणारी सुकेश चंद्रशेखरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली आहे. सुकेश हा कायद्याचा गैरवापर करत असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्याला फटकारले आहे. सुकेशला यापूर्वी दिल्ली सरकारबद्दल तक्रार होती, परंतु आता सरकार बदलले आहे, मग त्याला समस्या होऊ नये असे खंडपीठाने म्हटले आहे.









