नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची याचिका फेटाळली आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून 105 शासकीय प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला संजय सिंह यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हे प्रकरण यापूर्वीच अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने तेथेच यावर निर्णय घेतला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.









