याचिकेवर लवकर निर्णय घेण्यास दिल्ली हायकोर्टाला निर्देश
नवी दिल्ली : इशरत जहाँच्या प्रकरणाची चौकशी करणारे आयपीएस अधिकारी सतीश वर्मा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या बडतर्फीच्या आदेश आविरोधात आय़पीएस सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांच्या बडतर्फीच्या आदेशाला २६ सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाला आयपीएस वर्मा यांच्या याचिकेवर पुढील वर्षी 24 जानेवारीऐवजी 22 नोव्हेंबरला सुनावणी घेऊन तीन महिन्यांत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत.
इशरत जहाँ प्रकरणाच्या चौकशीत मदत करणाऱ्या वर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांच्या बडतर्फीच्या आदेशाला 26 सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली नाही. परिणामी, गृह मंत्रालयाने 30 ऑगस्ट रोजी काढलेला आदेश लागू होऊन केंद्राने त्यांच्या जागी आयपीएस महेश्वर दयाळ यांची नियुक्ती केली. उच्च न्यायालयाने पुढील वर्षी 24 जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी राखून ठेवली होती. न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.