वजूखानावर मुस्लिम पक्षकारांची चुकीची विधानं- यूपी सरकार
आॅनलाईन टीम
नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque Controversy) केसने देशातील वातावरण तापलं आहे. त्यावरच आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)सुनावणी घेण्यात आली. जिल्हा न्यायाधिशांसमोर हिंदू-मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी आज बाजू मांडली.यानंतर न्यायालयाने निकाल देत हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ही सुनावणी केली.यावेळी आठ आठवड्यात जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी अंतरिम आदेश पारित केला. जोपर्यंत देखभालक्षमतेचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत हा आदेश कायम राहील असेही सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने तीन पर्याय ठेवले आहेत. यामध्ये वाराणसी कोर्टाला सुनावणी पूर्ण करु द्या, सुनावणीपर्यंत कोर्ट अंतिम आदेश देऊ शकतं तसेच निर्णय येईपर्यंत अंतरिम आदेश लागू असेल, असे तीन पर्याय सुप्रिम कोर्टाने दिले आहेत.
सुप्रिम कोर्ट काय म्हणाले
वजूखानावर मुस्लिम पक्षकारांची चुकीची विधाने केली आहेत असं यूपी सरकारन म्हटलं आहे.
ज्ञानवापीप्रकरणी सुप्रीम कोर्टात उत्तर प्रदेश सरकारनं बाजू मांडावी. तसेच कनिष्ट न्यायालयाचा निर्णय थांबवला जाऊ शकतो असा निर्णय सुप्रिम कोर्टाने आज दिला आहे.
२५ वर्षाचा अनुभव असलेले जिल्हा न्यायाधीश प्रकरण एेकू शकतात असे सांगण्यात आले आहे.
जिल्हा न्यायाधीशांनी कसं काम करावं याबाबत आम्ही कुठलेही आदेश देणार नाही.
ज्ञानवापीप्रकरणी आमच्याकडून संतुलन ठेवण्याचा प्रयत्न
जिल्हा न्यायाधीशांसमोर दोन्ही पक्ष बाजू मांडतील असंही सांगण्यात आले.