नवी दिल्ली :
कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मिळाला आहे. या जामिनाच्या विरोधात आंध्रप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना नोटीस जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत जाहीरसभा, बैठकांमध्ये भाग न घेण्याचा निर्देश नायडू यांना दिला आहे.









