‘मोदी आडनाव’ बदनामीच्या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि प्रशांत कुमार मिश्रा यांनी गांधींच्या शिक्षेला स्थगिती द्यावी की नाही या संबंधित नोटीस जारी केली असून ४ ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करावी अशी न्यायालयाला विनंती केली. अभिषेक मनू संघवी यांच्या मतानुसार राहूल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकले नाहीत तसेच निवडणूक आयोग कधीही वायनाड मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे.
मोदी आडनावाच्या बदनामीच्या खटल्यातील भाजप आमदाराच्या तक्रारदाराची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाकडे किमान 10 दिवसांचा अवधी मागितला असून न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.









