Raj Thackeray : केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या न्यायालयीन लढ्यामध्ये अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलायं. गेले जवळपास दहा महिने होत असलेल्या सत्ता संघर्षात न्यायालयाने राज्य सरकारला अनुकूल निर्णय दिल्याने ‘शिंदेशाहीच’ यापुढे राहील असे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदत्याग केल्याने त्यांचे सरकार पुन्हा स्थापन करता येणार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केले. ठाकरे गटाचे काही मुद्दे न्यायालयाने मान्य केले असून सुद्धा निर्णय मुख्यमंत्री शिंदेंच्याच बाजूने लागला.पाच न्यायाधीशांच्या घटनापिठाने एकमुखाने निर्णय देताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात ताशेरे ओढले. कोर्टाच्या निर्णयानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे झोड उठवले आहेत.दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोर्टाकडून जी नोटीस येते ती वाचल्यानंतर कळत नाही. कारण भाषा खूप अवघड असते. मला जेव्हा नोटीसा येतात तेव्हा सोडलं की अटक केलं हे कळत नाही. काल सुप्रीम कोर्टानं सांगितल की, प्रोसेस चुकली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता.विधिमंडळातील गट पक्ष म्हणून समजला जाणार नाही असं म्हटलं. निवडणुक आयोगाने चिन्ह आणि नाव देण्याचा जो निर्णय घेतला त्याचं काय होणार? सुप्रीम कोर्टाच्या निकालावर निवडणुक आयोग काय करणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. कदाचित थोड्या दिवसात हा संभ्रम सगळ्यांचा दूर होईल असं वाटतयं, असंही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








