नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. शमीपासून वेगळी राहत असलेली पत्नी हसीन जहाँ हिने याचिका दाखल करत पोटगीची रक्कम वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. वर्तमान रक्कम माझ्या आणि मुलीच्या खर्चांसाठी अपुरी असल्याचा दावा हसीन हिने न्यायालयासमोर केला आहे. याप्रकरणी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीने स्वत:ची पत्नी आणि मुलीला एकूण 4 लाख रुपयांचा निर्वाह भत्ता दर महिन्याला द्यावा असा निर्देश दिला होता.









