वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बिहारमधील जातीय जनगणनेसंबंधीची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सोमवारी पुढे ढकलण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालय शुक्रवार, 18 ऑगस्टला यासंबंधीच्या सर्व याचिकांवर सुनावणी करणार आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने जातीय जनगणनेचे 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले होते. पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात एनजीओ ‘एक सोच एक प्रयास’च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता 18 रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्याचे म्हणणे सर्वोच्च न्यायालय ऐकून घेणार आहे.









