खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा.अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा असं सुप्रिम कोर्टानं म्हटलयं. यामुळे महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार राहणार असल्याचं स्पष्ट झालयं. कोर्टाचा निर्णय जाहीर होताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना संवाद साधला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानं शिंदे सरकार वाचलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पक्षावर दावा करता येणार नाही हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. राज्यपालांनी घेतलेली भूमिका घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे.त्यांची प्रत्येक प्रतिक्रिया राजकीय हेतूनं केली होती. उध्दव ठाकरे य़ांनी राजीनामा दिला नसता तर पुर्नप्रस्थापित करू शकलो असतो हे न्यायलयाचं निरीक्षण आहे. याचाच अर्थ हे सरकार बेकायदेशीर आहे.घटनाबाह्य आहे. 16 आमदारांचा निकाल अध्यक्षांकडे असेल तर योग्यचं आहे. घटनेनुसार देश, राज्य चालणार असेल तर आता विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, अस मत राऊत यांनी व्यक्त केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हा निकाल महाराष्ट्राला दिशा देणारा आहे.आम्ही न्यायालयाचे आभारी आहोत.पहिले तिन निर्णय महत्वाचे आहेत. त्यातील महत्त्वाचा म्हणजे शिंदे गटाचा व्हिप बेकायदेशीर आहे. त्यामुळे याचा अर्थच सरकार बेकायदेशीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी उगाच पेठे वाटू नयेत. नैतिकता असेल तर सरकाने राजीनामा द्या असेही राऊत म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








