नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला. त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे जिथे प्रक्रिया सुरू झाली तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
Previous Articleश्रीलंकेप्रमाणेच इराकमध्येही आंदोलन, संसदेचा घेतला ताबा
Next Article गुळ आणि धान्यावरील जीएसटी रद्द करा








