महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टने दिला आहे. यावेळी घटनापीठ सलग सुनावणी घेणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य घटनेवर आमचं प्रेम आहे. सगळं काही प्रेमाने होणार असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, 14 फेब्रुवारी हा व्हॅलेनटाईन डे आहे. प्रेमाचा दिवस आहे. सगळ काही प्रमाणे होईल असेही संजय राऊत म्हणाले.
आज दुपारी 3 नंतर निवडणूक आयोगाची सुनावणी होणार असल्याचेही ते म्हणाले.
तारीख कोणतीही असो आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी भक्कम आहोत, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
Previous Articleसी. ए. फायनल परीक्षेत सावंतवाडीच्या अभिषेक गांवसचे यश.
Next Article सातारा पोलीस दलाची मैदानी चाचणीचे गुणपत्रक जाहीर









