महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. यापुढे पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. गुरुवारी (ता. २५) तारखेला याबाबात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी होईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असा आदेश सुप्रिम कोर्टाने दिला आहे. यामुळे उध्दव ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या मागणीनंतर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. हे प्रकरण आता घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
घटनापीठ म्हणजे काय ?
घटनापीठात घटनात्मक बाबींमध्ये कायद्याचे स्पष्टीकरण करावे लागते. कायद्याच्या प्रश्नांचा अर्थ लावण्यासाठी अधिक न्यायाधीशांची गरज भासते. अशाप्रकरणातील सुनावणी घटनापीठाकडे जातात. तेव्हा सुनावणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त न्यायाधीशांद्वारे केली जाते. पाच किंवा त्याहून अधिकचे न्यायधीशांच्या पीठालाच घटनापीठ म्हणतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








