बाबासाहेबांच्या संविधानावर घाव घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची चिंता आम्हाला वाटत आहे. शिंदे गटानं संपर्कात असलेल्या १४ खासदारांची नावं जाहीर करावी असे आव्हानं शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केले. 16 आमदारांना अपात्र करा असं पत्र शिवसेनेच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आलं होतं. यावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, बेकायदेशीर निर्माण झालेल्या सरकारला बेकायदेशीर संरक्षण दिलं जात आहे. वेळकाढूपणा केला जात आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत. फक्त शिवसेना म्हणून न पाहता देशाच्या संविधानाच्या पायावर घाव घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सध्या अरुणाचल सारखा नियम लागू होत आहे. देशाच्या घटलेला पायदळी तुडवलं जात आहे. याचं दु:ख जादा होत आहे असेही ते म्हणाले. अरुणाचलचा निकाल तंतोतंत महाराष्ट्राला लागू होतो हे धान्यात घ्यायला हवं असेही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








