चिपळुणातील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
चिपळूण –
कोकणात नद्यांतील गाळ उपसा, पूर नियंत्रण यासह कृषि पूरक उद्योग,पर्यटनाला चालना, चिपळूण_कराडसह रखडलेले रेल्वे प्रकल्प, कारखानदारी आणि रोजगारसह कोकणच्या गतिमान विकासासाठी तुमच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे,तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यासाठी महायुतीला साथ द्या. कोकणच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथील जाहीर सभेत दिली. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून चिपळूण संगमेश्वरला भरभरून निधी दिला या पुढेही जे जे मागाल ते ते देऊ हा अजित दादांचा वादा असल्याचेही त्यांनी सांगितले.









