वार्ताहर /जांबोटी
सीमाप्र्रश्नाच्या सोडवणुकीसाठी 1956 सालापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत ओलमणी गावाने म. ए. समिती उमेदवारांना मताधिक्मय मिळवून दिले आहे. मराठी भाषा व संस्कृतीच्या संरक्षणासाठी यापुढे देखील ओलमणी गावातून खानापूर विधानसभा मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना मताधिक्मय मिळवून देण्याचे आश्वासन ओलमणी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलताना म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते वसंत नावलकर यांनी केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी खिराप्पा साबळे होते. प्रारंभी हणमंत जगताप यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या हस्ते हनुमान पूजन तसेच विठ्ठल रखुमाई व कालिकादेवी मूर्तीचे पूजन करून या सभेला प्रारंभ करण्यात आला. य् ाावेळी निरंजन सरदेसाई, यशवंत बिरजे, विलास बेळगावकर, गोपाळराव देसाई, जयराम देसाई, शंकरगौडा, राजू चिखलकर, उमेदवार मुरलीधर पाटील यांची कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. य् ाा सभेला पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, कृष्णा कुंभार, आबासाहेब दळवी, रुक्माण्णा झुंजवाडकर, जगन्नाथ बिरजे, अविनाश पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, राजाराम देसाई, जोतिबा जगताप, नारायण सुतार, शामराव साबळे, हनुमंत नावलकर, मल्लू देसाई, तुकाराम मुतगेकर, भैरू मुतगेकर, शिवाजी दळवी, शाहू साबळे, माऊती पाटील, पिंटू नावलकर, सुधीर नावलकर, बळवंत देसाई यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत गावातून पदयात्रा काढून घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.









