मणिपूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितांना न्याय मिळवून देण्याचा मुद्दा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मणिपूमध्ये दोन समुदायांदरम्यान 3 मे रोजी सुरू झालेली हिंसा अद्याप सुरू आहे. याचदरम्यान तेथे 2 महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेने या प्रकरणाला भयावह ठरविले आहे. दोन महिलांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ पाहून आम्ही स्तब्ध आहोत. आम्ही या घटनेतील पीडितांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना समर्थन करत असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटले आहे.
कुठल्याही सुसंस्कृत समाजात महिलांसोबत अशाप्रकारची घटना घडणे लाजिरवाणे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. मणिपूरप्रकरणी आम्ही शांततापूर्ण तोडग्याच्या बाजूने आहोत आणि प्रत्येक समुदायाच्या लोकांची आणि त्यांच्या संपत्तीचे रक्षण पेल जाईल अशी अपेक्षा करतो असे पटेल यांनी नमूद पेले आहे.
मदतीसाठी आम्ही तयार
यापूर्वी भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले होते. जगभरात कुठेही हिंसक घटना घडल्यास आम्हाला दु:ख होते असे वक्तव्यही त्यांनी केले होते. यापूर्वी 6 जुलै रोजी अमेरिकेने देखील मणिपूरच्या हिंसेबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारताने मदत मागितल्यास आम्ही त्याकरता तयार आहोत. हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे आम्ही जाणून आहोत. आम्ही लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होईल अशी आशा करतो. मणिपूरचय स्थितीबद्दल आम्हाला कुठलीच रणनीतिक चिंता नाही, आम्हाला केवळ लोकांची चिंता असल्याचे गार्सेटी यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या संसदेत मुद्दा उपस्थित
मणिपूरमधील हिंसेचा मुद्दा ब्रिटनच्या संसदेतही उपस्थित झाला आहे. ब्रिटनमध्ये धार्मिक स्वातंत्र्याशी निगडित विशेष राजदूत आणि खासदार फियोना ब्रूस यांनी 20 जून रोजी बीबीसीवर मणिपूर हिंसेप्रकरणी योग्यप्रकारे वृत्तांकन न करण्याचा आरोप केला होता. मणिपूमध्ये शेकडो प्रार्थनास्थळे जाळण्यात आली असून 100 हून अधिक जण मारले गेले आहेत. 50 हजारांहुन अधिक जणांना स्थलांतर करावे लागले आहे. शाळांना समाजकंटकांकडून लक्ष्य करण्यात आले आहे. हा प्रकार नियोजनाच्या अंतर्गत करण्यात येत असल्याचे यामुळे स्पष्ट होते आणि यात धर्म मोठा घटक असल्याचा दावा ब्रूस यांनी ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहात केला होता.
मणिपूर हिंसेचे कारण
मणिपूरमध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मैतेई समुदायाची मागणी आहे. या मागणीला कुकी अन् नागा समुदायांचा विरोध आहे. कुकी समुदायाकडून 3 मे रोजी आयोजित एका रॅलीनंतर राज्यात हिंसा भडकली असून आतापर्यंत यात 160 हून अधिक जण मारले गेले आहेत. मणिपूरमध्ये मैतेई समुदायाचे प्रमाण सुमारे 53 टक्के असून त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात आहे. तर नागा अन् कुकी यासारख्या आदिवासी समुदायांचे प्रमाण 40 टक्के असून ते पर्वतीय जिल्ह्dयांमध्ये राहतात.









