बेळगाव : उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजू सेठ यांच्या प्रचाराला जोर आला आहे. विविध परिसरात घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी हिंडाल्को आणि ढोर गल्ली परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन राजू सेठ यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी दि. 10 मे रोजी मतदान होणार असून आठ दिवस शिल्लक आहेत. आठ-दहा दिवसांपासून विविध परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन राजू सेठ यांनी प्रचार चालविला आहे. उत्तर मतदारसंघात त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी दिवसभर विविध ठिकाणी प्रचारफेरी काढली जात आहे. मंगळवारी हिंडाल्को परिसरातील वसाहतांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी विविध समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निवारण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले. त्याचप्रमाणे ढोर गल्ली परिसरातही प्रचार करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदारांना चांगल्या सुविधा तसेच आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्याचे राजू सेठ यांनी सांगितले. यावेळी प्रत्येकाला घरकुल आणि लहान मुलांना शिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleलक्ष्मी हेब्बाळकर यांचा मण्णूरमध्ये झंझावाती प्रचार
Next Article आर.एम.चौगुले यांना तुरमुरी महिलांचा पाठिंबा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









