कुडाळ -प्रतिनिधी
कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीच ज्यांच्यासाठी निवाऱ्याचा आधार बनलेल्या व पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर सुखरुप बाहेर काढण्यात आलेले बेवारस वृद्ध पन्नालाल यांना अखेर पणदूर येथील सविता आश्रमात आधार देण्यात आला. कुडाळ न.पं.चे भाजप गटनेता विलास कुडाळकर यांच्या सहकार्याने तसेच आश्रमाच्या प्रक्रियेनुसार कुडाळ पोलिसांच्या परवागीने पन्नालाल यांची आश्रमात सोय करण्यात आली. यासाठी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांचे सहकार्य लाभले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या शेडमध्ये गेली दोन वर्षे ही वृद्ध व्यक्ती राहत होती. सर्वजण त्याला पन्नालाल या नावाने संबोधितात.त्यांना फक्त हिंदी भाषा बोलता येते आणि समजते. दोन दिवसापूर्वीच्या म्हणजे गुरुवारी पाण्याच्या पुरात अडकल्याबाबत आनंद रेसिडेन्सीमध्ये राहणारे संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्रा. चौगुले यांनी डॉ. आंबेडकरनगर येथील रहिवासी व संत राऊळ महाराज महाविद्यालयात नोकरीला असलेले प्रवीण जाधव यांना संपर्क साधला. नंतर जाधव यांनी स्थानिक नगरसेवक व भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांना कळविले. याबाबत श्री कुडाळकर यांनी तहसीलदार अमोल पाठक व कुडाळ पोलिसांना माहिती दिली.तेव्हा श्री पाठक यांच्यासह महसूल ,नगरपंचायत व पोलीस यंत्रणेची टीम तेथे दाखल झाली. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्या वृद्धाला अर्धा किमी पाण्याच्या पुराचे अंतर काटत सुखरूप बाहेर काढले होते. त्याचे वारस कोण ते निष्पन्न झाले नव्हते. तो पर्यंत तेथील न्यू इंग्लिश मध्ये पन्नालाल यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









