घुणकी प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली- सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला किणी येथील मराठा समाजाकडून पाठींबा दिला असून त्यांच्या समर्थनार्थ गावामध्ये उपोषणाला सुरवात केली आहे.
किणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने झैडा चौकामध्ये सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून उपोषणास सुरूवात करण्यात आली. तर अत्यावश्यक सेवा वगळता गावातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. विविध संस्थाचे पदाधिकारी व मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.यावेळी सकल मराठा समाज बाधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. नंतर व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले. यावेळी पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.









