खानापूर : गेल्या 68 वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहे. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करीत आले आहेत. यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल. यासाठी समितीला विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहन रणजित पाटील यांनी केले. हलगा (ता. खानापूर) येथे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली आणि प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांचे स्वागत विट्ठल गुरव यांनी केले. हलगा भागाने नेहमीच सीमाप्र्रश्नी साथ दिली आहे. या भागातील मराठी भाषिकांनीच समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. सध्या राष्ट्रीय पक्षांनी अनेक आमिषे दाखवून मराठी भाषिकांना आपल्या वळचणीला बांधण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण या भागातील जनता स्वाभिमानी असून ती कोणत्याची आमिषांना बळी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. हलग्यासह विविध गावांतील नागरिकांनी यावेळी स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभाग घेत मुरलीधर पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार केला. त्यानंतर झालेल्या सभेलाही मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हलगा भागावर दावा करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई, आप्पाण्णा ईश्राण, डी. एम. गुरव, नरसिंग फटाण, एन. डी. कदम, तुकाराम फटाण, वसंत सुतार, वैशाली सुतार, नीता फटाण, महादेव पाटील, कल्लाप्पा फटाण, सावित्री पाटील, विजय ईश्राण, ज्ञानेश्वर सनदी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleन्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोला उत्तम प्रतिसाद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









