गोवा सरकारच्या प्रयत्नांना आले यश : सात महिन्यांत 155 वाहनांची नोंदणी,दिवसाला रु. 4500 पर्यंत कमविण्याची संधी,वाहन खरेदीसाठी गोवा माईल्सकडून आर्थिक मदत
पणजी : राज्यातील बेरोजगार युवकांबरोबरच मूळ गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांना फायदा व्हावा आणि त्यांना कायमस्वऊपी काम मिळावे, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या गोवा माईल्स सेवेच्या प्रयत्नांना यश मिळत असून, गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिक व बेरोजगार तऊणांना गोवा माईल्सचे पाठबळ मिळत आहे. देशात प्रथमच गोवा माईल्सची सेवा गोव्यात सुरू झाली असून सरकारचा उद्देश साध्य होताना दिसत आहे. गोवा माईल्स सेवा सुरू करताना सुरूवातीला विरोध झाला असला तरी आता अधिकाधिक गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिक यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. गेल्या सात महिन्यांत 155 नवीन वाहनांची गोवा माईल्सकडे नोंदणी झालेली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 55 तर दुसऱ्या टप्प्यात 100 वाहनांची भर पडली आहे. गोवा माईल्स हे अॅप 6 ऑगस्ट 2018 रोजी सुरू करताना केवळ आणि केवळ गोमंतकीय चालकांचाच विचार करण्यात आला. ‘मुख्यमंत्री टॅक्सी पात्रांव’ ही योजना बहुउद्देशीय आहे. याचा लाभ गोमंतकीय टॅक्सी चालकांना देण्याचा सरकारचा मुख्य हेतू असून याचा कुणीही लाभ घेऊ शकतो. बेरोजगार युवक, युवती यांना सक्षम करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेली ही योजना असून, नवीन वाहन खरेदीसाठी गोवा माईल्समार्फत पूर्णपणे आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गोवा माईल्सकडून मिळते पाठबळ
गोवा माईल्सचे संस्थापक उत्कर्ष दाभाडे यांनी सांगितले की, गोवा माईल्समध्ये सहभागी होताना गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांसाठी वाहन खरेदीसाठी सुमारे 90 हजार ऊपये डाऊनपेमेंट व इतर आर्थिक मदत मिळून सुमारे 1 लाख 30 हजारांचे आर्थिक पाठबळ दिले जाते. राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी मदतही केली जात आहे. यामध्ये महिन्याला 20 हजार ऊपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तऊणांना किंवा युवतींना प्रथम प्राधान्य दिले जाते. गोवा माईल्सकडे नोंदणी झालेल्या चालकांना सद्य:स्थितीत सुमारे दिवसाला 2800 ते 4500 ऊपयांपर्यंत भाडे मिळत असल्याचा दावा गोवा माईल्सने केला आहे. प्रत्येक वाहनचालकांना भाडे मिळावे, यासाठीही गोवा माईल्सकडून लक्ष दिले जात आहे.
व्यवसायासाठी या आहेत अटी
‘गोवा माईल्स’मध्ये सहभागी होताना टॅक्सीचालक हा मूळ गोमंतकीय असणे आवश्यक आहे. गोव्यात स्वत:चे घर असावे किंवा मतदान ओळखपत्र असणे गरजेचे. गोवा माईल्समध्ये सहभागी होणाऱ्या चालकांचे जवळच्या नातेवाईकांपैकी पत्नी, भाऊ यापैकी कुणी सरकारी नोकरीत नसावे. मूळ गोमंतकीय असलेल्या दोन व्यक्तींच्या ओळखीचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
प्रदूषणमुक्त गोव्यासाठी गोवा माईल्सला सूचना : डॉ. प्रमोद सावंत
राज्यात जे व्यावसायिक वाहनचालक आहेत, त्यांच्या पेट्रोल वाहनांना लवकरात लवकर सीएनजीमध्ये आणण्यासाठी गोवा माईल्सला सरकारकडून सूचना देण्यात आलेली आहे. त्यादृष्टीने गोवा माईल्सच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ उभे करून सवलतीच्या दरामध्ये सीएनजी कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गोवा राज्य प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारमार्फत पाऊले उचलण्यात आलेली आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
युवती, महिलांना सक्षम करण्याचा उद्देश : उत्कर्ष दाभाडे
गोवा माईल्सच्या सेवेमध्ये महिलांनाही सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश असून, युवती चालक यामध्ये आल्यास त्यांना सरकारच्या ‘सुकन्या’ योजनेत दर महिन्याला गोवा माईल्सचे 500 ऊपये व सरकारचे 500 ऊपये असे एक हजार ऊपयांची अतिरिक्त मदत देण्याची सोय सरकारने केलेली आहे. होतकरू युवतींनीही या व्यवसायात येऊन सक्षम उद्योजक बनावे, असे आवाहन गोवा माईल्सचे प्रमुख उत्कर्ष दाभाडे यांनी केले आहे.









