गुहागरच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांचे आवाहन
गुहागर :
कोकणात पर्यटन विकासाला वाव असून संपूर्ण महाराष्ट्राला पोसण्याची ताकद कोकणात आहे. मात्र, येथील जनतेचे दुर्दैव आहे की तसे घडलेले नाही. तो प्रयत्न येथील राजकर्त्यांनी केला असता तर येथील तरुणांना बाहेर रोजगाराला जाण्याची गरज पडली नसती. कोकणाला सुंदर बनवण्यासाठी एकदा हातात सत्ता द्या. केरळ, गोव्याला मागे टाकू, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुहागर-पाटपन्हाळे येथील मैदानावरील जाहीर सभेत केले. उमेदवार प्रमोद गांधी व दापोलीचे उमेदवार संतोष अबगूल यांच्या प्रचारार्थ पाटपन्हळे (शृंगारतळी) येथील मैदानावर जाहीर सभेत ते बोलत होते.









