वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि. 8) विजयनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. प्रारंभी विजयनगर येथे आर. एम. चौगुले यांचा भगवा फेटा व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजयनगर, शिवगिरी कॉलनी, पाईपलाईन रोड, रक्षक कॉलनी, डिफेन्स कॉलनी, लक्ष्मीनगर, देसाई कॉलनी आदी भागांमध्ये त्यांची पदयात्रा काढून नागरिकांच्या घरोघरी गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच विजयनगर परिसरातील सर्व नागरिकांनी आर. एम. चौगुले यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. घरोघरी त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला असून सर्व युवक मंडळांनी देखील आर. एम. चौगुले यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. पदयात्रेमध्ये गव्ह. कॉन्ट्रॅक्टर शिवाजी अतिवाडकर, मनोज पावशे, प्रकाश पाटील, बळवंत झेंडे, बाळकृष्ण दफेदार, पी. एस. पाटील, वाय. एस. चौगुले, के. के. मरुचे, सुरेश रेडेकर, पियुष हावळ, शिवाजी बाडीवाले, विजय कोलेकर, मधुकर चलवेटकर, शंकर गर्डे, सुरेश बोकडे, तात्यासाहेब भोसले व कार्यकर्ते, परिसरातील नागरिक उपस्थित होते









