कणकवली / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्यावतीने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली व पाठिंबा जाहीर केला. आमदार नितेश राणे हे अडचणीच्या वेळी व समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी आमच्या सोबत असतात. उद्भवलेली समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आमदार नितेश राणे यांची मोठी मदत आम्हाला होते, असे मत यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव कमलाकर मांगले पाटील, रायगड जिल्हा संघटक गणेश ढेणे पाटील, रायगड जिल्हा सहसचिव कृष्णा माळी पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा सचिव हेमंत सावंत, पोलीस पाटील कणकवली तालुका अध्यक्ष उदय सावंत आदी उपस्थित होते.
Previous Articleरक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णाचा जीव टांगणीला…
Next Article उमेदवार गावांत अन् मतदार शेतात..









