शहापूर, खादरवाडी, पिरनवाडी परिसरात प्रचारफेरी : लोकहिताचे प्रकल्प राबविण्याची ग्वाही
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराची मोहीम हाती घेतली. त्यांनी जेड गल्ली, भोज गल्ली, कोरे गल्ली, पिरनवाडी, खादरवाडी परिसरात प्रचारफेरीद्वारे मतदारांना काँग्रेसला मत देऊन प्रचंड मतांनी निवडून आणण्याची विनंती केली. काँग्रेसचे मत म्हणजे विकासाला मत, हे लक्षात घेऊन भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती प्रभावती मास्तमर्डी यांनी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवून निवडून देण्याचा निर्धार केला. सध्या विविध भागात प्रचारमोहीम राबविण्यात येत असून शहापूर जेड गल्ली, भोज गल्ली, कोरे गल्ली, मेलगे गल्ली, अळवण गल्ली, खडेबाजार शहापूर परिसर त्याचप्रमाणे सायंकाळी पिरनवाडी परिसरात सिद्धेश्वर गल्ली, अष्टविनायक नगर, माऊती नगर, संगोळ्ळ रायण्णा नगर, जनता प्लॉट, रामदेव गल्ली, शिवाजी गल्ली, तानाजी गल्ली, लक्ष्मी गल्ली, गणपत गल्ली, दत्तनगर, जिनदत्त नगर आदी परिसरात घरोघरी जाऊन काँग्रेसला मत देण्याची विनंती केली. यावेळी पिरनवाडी परिसरात काँग्रेसला निवडून देण्याची ग्वाही दिली.
सायंकाळी प्रभावती मास्तमर्डी यांनी खादरवाडी परिसरात डोळेकर गल्ली, माऊती गल्ली, पाटील गल्ली, माळवी गल्ली, शिवाजी रोड, गोरल गल्ली, पिंगट गल्ली, नेसरकर गल्ली व जनता कॉलनी येथे घरोघरी जाऊन प्रचार केला. परिसरातील मतदारांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याची प्रभावती मास्तमर्डी यांनी ग्वाही दिली. मतदारांनी त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. स्थानिकांनी अनेक कष्ट सहन केले. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, स्वच्छतेचा अभाव, योग्य रस्त्यांचा अभाव याबाबत मत मांडले. काँग्रेस पक्षाची सत्ता राज्यात आली तर मतदार संघाचा विकास शक्य असल्याचे सांगितले. त्याशिवाय काँग्रेसच्या पाच गॅरंटींची माहिती दिली, जेणेकरून लोकहिताचे प्रकल्प राबविता येतील. काँग्रेसच्या ध्येयधोरणांची माहिती देऊन निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतांनी विजयी करणे ही काळाची गरज आहे. वाढती महागाई त्याचप्रमाणे नवनवीन अडचणी नागरिकांना भेडसावत आहेत. या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. केवळ स्मार्ट सिटी बनवून विकास होत नसून नागरिकांच्या समस्या पाहणे गरजेचे आहे. हे काम सध्याच्या सरकारने केले नसल्याचे प्रभावती मास्तमर्डी यांनी सांगितले.









