आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आवाहन, नानेरवाडा येथे विकासकामाचा शुभारंभ
पेडणे : पेडणे मतदारसंघाच्या विकासासाठी आणि पर्यायाने पेडणे पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी विकास कामांना नागरिकांनी सहकार्य करावे, एखाद्या वेळी रस्ता ऊंदीकरण असताना जर आपले दगडी कुंपण किंवा झाडांची कुंपण असेल तर ती जागा रस्त्याला थोड्या प्रमाणात देऊन सार्वजनिक हितासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले. नानेरवाडा पेडणे येथील प्रभाग क्रमांक चार मधील नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर यांच्या प्रभागातील श्री देव राष्ट्रोळी, ब्राम्हण परिसरातील शेड व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, उपनगराध्यक्ष आश्विनी पालयेकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई ,नगरसेवक मनोज हरमलकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका उषा नागवेकर, ऊद्रेश नागवेकर व नागरिक उपस्थित होते. पेडणे पालिकेने प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागांमध्ये कशा पद्धतीने आपण विकास करणार त्यासाठी प्रयत्न करावेत. विकासासाठी आपले आणि सरकारचे सदोदित सहकार्य मिळणार आहे. जर नगरसेवकांनी प्रयत्न केले नाही तर आपापल्या प्रभागाचा विकास कसा होईल ? एखाद्या प्रभागांमध्ये चांगल्या प्रकारचा आणि दर्जात्मक जर विकास होत असेल तर त्याचे श्रेय तेथील नगरसेवक आणि नागरिकांना जात असते. त्यामुळे नागरसेवक किती जागृत आणि किती सक्षम आहे ते दिसून येते. त्यासाठी प्रत्येक निवडून आलेल्या नगरसेविकांनी नगरसेवकाने आपापल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आमदार आर्लेकर म्हणाले.
प्रभाग क्रमांक चार च्या नगरसेविका उषा नागवेकर यांच्या प्रभागांमध्ये जास्तीत जास्त विकासाची कामे होत आहेत. ही कामे अशीच चालूच राहावी .या प्रभागांमध्ये विकास कामे करण्यासाठी नगरसेविका उषा नागवेकर कार्यरत आहेत. शिवाय त्यांचे मिस्टर ऊद्रेश नागवेकरही सरकार दरबारी प्रयत्न करून वेगवेगळ्या विकास कामांची मंजुरी मिळून ते काम जलद गतीने कसे होणार यावर त्यांचा कटाक्ष असतो, असे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी सांगितले. एखाद्या छोट्याशा मंदिरातील जर छोटसं काम केलं तर देवाचाही आशीर्वाद आणि नागरिकांचा आशीर्वाद मिळत असतो. तोच आशीर्वाद आपल्याला या प्रभागातील नागरिकांनी दोन वेळा दिलं. त्याच बळावर दोन वेळा नगराध्यक्ष पद आपणास मिळाले. त्या पदावर असताना विकास कामे करण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न केले. आताही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका उषा नागवेकर यांनी सांगितले.
आमदार आर्लेकर यांनी विरोधकांकडे लक्ष देऊ नये
विरोधकांचे काम केवळ टीका करणे आणि एखाद्या विकास कामासाठी किंवा चांगल्या प्रकल्पासाठीही विरोध करण्याच ते काम करत असतात. प्रकल्पाविषयी किंवा एखाद्या कामाविषयी त्यांची त्यांना जाणीव नसते. ते अभ्यास करत नाही. आणि अनेक वेळा या टिकेलाही सामोरे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना जावे लागते. त्यासाठी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विरोधकांच्या टीके कडे लक्ष देऊ नये, असेही उषा नागरेकर म्हणाल्या.









