महिला मोर्चा उपाध्यक्षा सुवर्णा पाटील : शेताच्या बांधावर जावून साधला संवाद
खानापूर : देशात मोदींच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. देशातील महिला सबल झाल्यास देश निश्चित प्रगतीत उच्चांक गाठेल. हाच दृष्टिकोन ठेवून महिलांसाठी भाजप कार्यरत आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील महिलांनी भाजपला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी महिलांशी संवाद साधताना केले. नंदगड, किरहलशी, हत्तरवाड, बेकवाड, कसबा नंदगड, खैरवाड या भागातील महिलांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावून त्यांनी संपर्क साधला. खानापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा प्रचार करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातील महिला मोर्चाच्या सदस्यांना जबाबदारी दिलेली आहे. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधण्यासाठी दौरे करण्यात येत आहेत. यावेळी महिला शेतात कामात असताना त्यांच्याशी संवाद साधून भाजपला मतदान करण्याचे आवाहन महिला मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावेळी खानापूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री देसाई, स्वरुपाजी, निर्मला पाटील यासह इतर महिला मोर्चाच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या. य् ाावेळी कसबा नंदगड, बेकवाड, खैरवाड, किरहलशी, हत्तरवाड, नंदगड येथील महिलांशी संपर्क साधत भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.









