मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज बेळगावात
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते शनिवारी सिव्हिल हॉस्पिटल आवारातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री विशेष विमानाने बेळगावला येणार आहेत. दुपारी 12.10 वा. सुपरस्पेशालिटी इस्पितळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांचे सिव्हिल हॉस्पिटल आवारात आगमन होणार आहे. याचवेळी डॉक्टरांच्या वसतीगृह उभारण्याच्या कामालाही चालना देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अनुदानातून उभारण्यात आलेल्या वायव्य परिवहन मंडळाच्या शहर बसस्थानकाचेही उद्घाटन होणार आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या हिरेबागेवाडी कॅम्पसमधील विकासकामांना बिम्स आवारातच चालना देणार आहेत. सायं. 4.40 वा. विशेष विमानाने बेंगळूरला रवाना होणार आहेत.









