सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालयातील २१ दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालयातील २१ दिवसाच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सपत्नीक गणेश दर्शन घेवुन मिरवणुकीमध्ये सहभाग घेत नाचण्यात दंग झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यामध्ये अधिक जोश भरला .
सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस कर्मचारी वसाहती मध्ये सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. २१ दिवस विविध धार्मिक आणि संस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सोमवारी २१ दिवसांनी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस वसाहत ते ओरोस फाटा मार्गे पीठढवळ नदीवर विसर्जन करण्यात आले. यावेळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सपत्नीक गणरायाचे दर्शन घेतले. व मिरवणुकीतही सहभाग घेत आनंद घेतला .
दरम्यान यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी गणेशोत्सवा बद्दल बोलताना गणेशोत्सव काळात जे आपण वातावरण बघितले ते कुठेही पाहता आले नाही . येथील लोक चांगले आहेत. अतिशय मनोभावे घराघरात गणपतीचे पूजन करतात .अतिशय भक्तिमय वातावरण गणेशोत्सव साजरा करतात. आणि कुठेही गडबड गोंधळ न होता अतिशय शांततेत व सलोख्याच्या वातावरणात गणेशोत्सव पार पडला…









