रत्नागिरी :
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरी जिह्यातील समुद्र किनाऱ्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी शहरातील मिरकरवाडा बंदर येथे मच्छिमारांशी संवाद साधल़ा यावेळी त्यांनी स्थानिक मच्छीमार आणि नेपाळी खलाशी यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
तसेच बगाटे यांनी समुद्र किनाऱ्यावरील बोटींची तपासणी केली. यावेळी त्यांच्या सोबत अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके, पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक नितीन भोईर व पोलीस दलातील नौका कक्षाचे अधिकारी उपस्थित होते.








