सनी लियोनीने जिस्म 2, रईस, तेरा इंतजार आणि एक पहेली लीला यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती वेबसीरिजमध्येही दिसून आली आहे. आता तिने स्वत:च्या आगामी प्रोजेक्टचा तपशील शेअर केला आहे, याचे चित्रिकरणही तिने सुरू केले आहे. या प्रोजेक्टकरता ती दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत काम करणार आहे.
सनी लियोनीने एक पोस्ट शेअर केली असून यात ती विक्रम भट्टसोबत दिसून येत आहे. दोघेही क्लॅपबोर्ड हातात पकडून त्यावर ‘बिट्रेयल’ असे लिहिलेले आहे. याचबरोबर सनीने कॅप्शनदाखल ‘स्वत:च्या पसंतीच्या दिग्दर्शकांपैकी एकासोबत पुन्हा काम करण्याची मिळाली आहे’ असे नमूद पेले आहे.
सनीने यापूर्वी विक्रम भट्टसोबत अनामिका वेबसीरिजमध्ये काम केले होते. 2022 मध्ये प्रदर्शित या सीरिजचे दिग्दर्शन विक्रम भट्टने केले होते. तर सनीने बॉलिवूडमध्ये जिस्म 2 या चित्रपटाद्वारे 2012 साली पदार्पण केले होते. परंतु ती 2011 मध्येच रियलिटी शो बिग बॉसमध्ये सामील होत भारतात प्रसिद्ध झाली होती.









