► वृत्तसंस्था / दुबई
सनी धिलाँ यांच्यावर अमिरात क्रिकेट मंडळाने सहा वर्षांची बंदी घातली आहे. भ्रष्टाचार विरोधी नियमाचा भंग केल्याने धिलाँवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आयसीसीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
अबुधाबीमध्ये सुरू असलेल्या टी-10 लीग स्पर्धेत खेळणाऱ्या एका संघाचे धिलाँ सहाय्यक क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. धिलाँकडून हा गुन्हा घडल्याचे आढळून आले. सामन्यांचे निकाल निश्चित करण्यासाठी धिलाँने आर्थिक स्वरुपात देव-घेव केल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. 2024 च्या अबुधाबी टी-10 लीग स्पर्धेवेळी धिलाँवर हंगामी स्वरुपातील निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 2024 च्या अबुधाबी टी-10 स्पर्धेचे अजिंक्यपद डेक्कन ग्लेडीएटर्सने पटकाविले. तर जोस बटलरला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले होते.









