Praful Patel Ajit Pawar News : राष्ट्रवादीकडून नऊ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. तटकरे, पटेलांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आलीयं. याबाबत कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना पत्र लिहले. दरम्यान आज प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरेंची नियुक्ती केल्याची घोषणा केली. तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, कुणावरही अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे होऊ शकत नाही. राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरेंची नियुक्ती करण्यात आली. जयंत पाटील यांना पत्र पाठवलं आहे. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करतो. त्यांनी त्यांची जबाबदारी तटकरे यांच्याकडे हॅन्ड ओव्हर करावी अशी अधिकृत सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती पटेल यांनी दिली. पुढील नियुक्त्यांसाठी सुनील तटकरेंना पूर्ण अधिकार असल्याचेही ते म्हणाले. आत्तापासूनच तटकरेंनी कामाला सुरुवात करावी. तसेच जयंत पाटलांनी हस्तांतरणाची प्रक्रया सुरु करावी.जयंत पाटलांना प्रदेशाध्यपदावरून मुक्त केलं असल्याचेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक नियुक्तींनी सुरुवात झाली आहे.. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. तसेच अजित पवारांची विधीमंडळ नेते म्हणून नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.तसचे प्रतोदपद अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. नव्या नियुक्त्यांबद्दल विद्यमान अध्यक्षांना कळवलं असल्याचे ही ते म्हणाले.








