वेबसीरिजमध्ये विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत
एमएक्स प्लेयर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीशी निगडित एक वेबसीरिज आणणार आहे. या सीरिजचे नाव ‘धारावी बँक’ असून यात सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सोनाली कुलकर्णी यासारखे दिग्गज कलाकार आहेत. ही एक क्राइम आणि थ्रिलर धाटणीची सीरिज आहे.

या चित्रपटाचे चित्रिकरण धारावीतच पार पडले आहे. गुन्हे आणि रहस्याने युक्त या वेबसीरिजचे दिग्दर्शन समित कक्कड यांनी पेले आहे. धारावी बँकची कहाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असल्याचे उद्गार एमएक्सचे चीफ कंटेंट ऑफिसर गौतम तलवार यांनी काढले आहेत.
सुनील शेट्टीची यात अत्यंत वेगळी भूमिका असल्याचा दावा करण्यात येत आहे. सुनील शेट्टी यापूर्वी मुंबई सागा या चित्रपटात दिसून आली होती. त्यानंतर तेलगू चित्रपट ‘मोसागल्लु’ तसेशच मल्याळी चित्रपट ‘मारक्कर ः लायन ऑफ द अरेबियन सी’मध्ये त्याने काम केले होते.









