सांगली प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी शुक्रवारी सुनील पवार रूजू झाले. सुनील पवार हे कल्याण डोंबिवली मनपाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. गुरुवारी त्यांच्या बदलीचा आदेश येताच आज शुक्रवारी दुपारी त्यांनी आयुक्त कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला.
यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, संजय बजाज, सुरेश आवटी यांनी पदाधिकारी यांच्यावतीने तर उपायुक्त राहुल रोकडे यांनी प्रशासनाकडून नूतन आयुक्त सुनील पवार यांचे स्वागत केले. याचबरोबर महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी पदाधिकारी यांनीही आयुक्त पवार यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय साधत काम करण्याची ग्वाही नूतन आयुक्त सुनील पवार यांनी देत जनतेने महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले.








