जमीन घोटाळा प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने आणखी एक गुन्हा नोंद केला असून या प्रकरणात एका संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात भादंसच्या 420, 465, 467, 468, 471 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. याबाबत जगदीप बन्सल यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव सुनिल कुमार (तिस्क उजगाव) असे आहे. संशयिताने आसगाव येथील सर्वे नंबर 33/1 या जमिनीची बोगस कागपत्रे तयार केली. नंतर ती कागदपत्रे संबंधीत खात्यात सादर करून सदर जमीन तक्रारदाराच्या नावे केली. तक्रारदाराला मालकी हक्क मिळवून दिला. मात्र सर्व कागदपत्रे बनावट होती. तक्रारदाराला याबाबत खरी माहिती उघड होताच त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली आणि सुनिल कुमार याला अटक करण्यात आली. गुन्हा अन्वेषन विभागाचे विशेष तपास पथक याबाबत पुढील तपास करीत आहेत.