आज सुनील मनोहर गावसकर यांचा 75 वा वाढदिवस. तमाम भारतीयांना क्रिकेटच्या प्रेमात टाकणारी व्यक्ती म्हणजे सुनील गावसकर. किंबहुना मी तर म्हणेन की करोडो भारतीयांच्या मनात क्रिकेट नावाचा डीएनए जो ऊतून बसलाय त्याला कारणीभूत ही सुनील मनोहर गावसकरच. असे हे महनीय व्यक्ती मूळ सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावचे. मला आठवते ज्यावेळी सुनील गावस्कर यांनी 35 वर्षे अबा धित राहिलेला डॉन ब्रॅडमन यांचा 29 शतकांचा विक्रम वेस्टइंडीज विऊद्ध मोडीत काढल्यानंतर काही दिवसात वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकां मार्फत सुनील गावसकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी मी साधारणत: आठवीत की नववीत होतो. वेंगुर्ले येथील कॅम्प मैदानात हा सत्कार याची देही याची डोळा बघण्याचे भाग्य मला मिळालं होतं.असो.
फलंदाजी करताना डोक्यावर कुठलही हॅल्मेट ( शिरस्त्राण ) न वापरता पनामा कॅप चा उपयोग करत सोळा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी केली. त्या काळात विंडीजच त्रिकूट रॉबर्ट,मार्शल, गार्नर तर कांगारूच त्रिकूट लिली,थॉमसन, लेन पास्को यांचा मारा समर्थपणे खेळलाच नाही तर त्यांच्याविऊद्ध ख्रोयाने धावा जमवल्या. सुनील गावस्कर सरांमुळे ख्रया अर्थाने बरेच क्रिकेट रसिक क्रिकेटकडे वळले गेले. आज भारतीय संघ अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचला आहे. परंतु त्याचा पाया ख्रया अर्थाने मजबूत केला तो गावस्कर सरांनी. सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून देण्याची सवय लावली. क्रिकेट इतिहासात पाच अंकी धावसंख्या असणारा कसोटी क्रिकेट मधील पहिला फलंदाज सुनील गावस्करच.
क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूवर आदर्श संस्कार कसे करावेत हे गावस्कर सरांकडून शिकावं. सुनील गावस्कर यांच्या बद्दल काही किस्से मनोरंजक तर काही किस्से देशा अभिमानास्पद आहेत. त्यातीलच एक किस्सा हिंदी क्रिकेट समालोचक सुशील दोषिनीं सांगितलेला मला आठवतो. 2000 साली ऑस्ट्रेलिया संघ भारतात आला होता. सदर कसोटी सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर झाला होता. समालोचनाच्या निमित्ताने वि.वी. करमरकर,चंद्रशेखर संत यांच्या समवेत मी वानखेडे स्टेडियमवर आकाशवाणीच्या समालोचन कक्षात होतो. सदर सामना हा ऑस्ट्रेलियन संघाने पावणे तीन दिवसात संपवल्यानंतर तिस्रया दिवशी संध्याकाळी आम्ही सर्व मराठी आकाशवाणी समालोचक ग्रुप खेळपट्टीकडे गेलो होतो.त्यावेळी सुशील दोशी यांच्याशी सर्वांची गाठभेट झाली होती. त्यावेळी सुशील दोषी यांनी सांगितलेला तो किस्सा निश्चितच अभिमानास्पद होता. 1977/78 च्या पाकिस्तान द्रौयात लाहोर कसोटी सामना संपल्यानंतर भारताचे मॅनेजर फत्तेसिंग गायकवाड यांनी एक पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला सुशील दोषी आकाशवाणी क्रिकेट समालोचक म्हणून आमंत्रित होते. ती पार्टी सुरू झाल्यानंतर ठती आलीठ ठती आलीठ असे सुर कानी उमटू लागले होते. अर्थात ती दुसरी तिसरी कोण नव्हती तर साक्षात पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका नुरजहाँ होती. त्यावेळी फत्तेसिंग गायकवाड यांनी सुनील गावस्कर यांच्याकडे बघून नूरजहाँना प्रश्न केला होता की तुम्ही यांना ओळखलं असेलच. त्यावेळी ती म्हणाली होती मी झहीर अब्बास, मुदस्सर नजर, यांना ओळखते. लगेच फत्तेसिंह गायकवाड यांनी नूरजहाँ कडे बघत सुनील गावसकर यांना प्रश्न केला की तुम्ही यांना ओळखतच असाल. त्यावर सुनील गावसकर यांनी कमालीचा हजरजबाबीपणा दाखवत मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो असे सांगितले. हा देशा अभिमान बघून त्यावेळी सर्वजण ख्रया अर्थाने अवाक झाले होते. हे सुशील दोषी आवर्जून सांगत होते. 1980 च्या दशकात पाकिस्तान मध्ये खराब पंचगिरीचे पेव फुटलं होतं. त्या काळात पाकिस्तान मध्ये चेंडू पॅडवर आदळून घेणं म्हणजे फार मोठा गुन्हा होता. एकदा अशाच खराब निर्णयामुळे सुनील गावसकर यांनी त्यांचा सलामीविर सहकारी चेतन चोहान ला सोबत घेऊन मैदान सोडले होते. एवढं धारिष्ट दाखवणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू.
कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर समालोचन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर मागील 35 वर्षे क्रिकेटमध्ये त्यांचा शब्द म्हणजे ठप्रमाणठ मानलं जातं. किंबहुना कधी कधी आयसीसी ही सुनील गावसकर यांच्यापासून चार हात दूरच राहते. सध्याच्या मनोरंजनात्मक क्रिकेट समालोचनात सुनील गावसकर यांचं क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचं महती व्यक्त करणार समालोचन आजही क्रिकेट रसिकांना आवडतं हे विशेष. क्रिकेटमध्ये बॅड पॅच कुणालाचं चुकलं नाही. त्यांच्या बॅड बॅच बद्दल सुनील गावसकर यांचे वडील मनोहर गावस्कर यांनी वेंगुर्ले येथील एका स्पर्धेच्या निमित्ताने माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले होते. ज्यावेळी सुनील गावसकर बॅडपॅच मध्ये होते त्यावेळी ते मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी ख्रया अर्थाने शिवसेनाप्रमुखांनी सुनीलला धीर दिला होता हे त्यांनी आवर्जून नमूद केलं होतं. कसोटी क्रिकेट खेळत असताना त्यांचा सदैव लक्ष हे मुंबईच्या रणजी संघावर राहायचं हे विशेष. कुठला खेळाडू खराब कामगिरीतून जातोय त्याच्यावरती त्यांचा बारीक लक्ष असायचं. आयपीएलच्या जमान्यात भारतीय क्रिकेटमध्ये रणजी करंडक स्पर्धा आजही महत्वपूर्ण आहे हे ते आजही ठणकावून सांगतात.मी आतापर्यंत क्रिकेटच्या तीन पिढ्या बघितल्या परंतु सुनील गावसकर सरांचे थोडक्यात वर्णन करायचे झालं तर ठझाले बहु होतील बहू परी या सम हाचठ. सुनील गावसकर यांच्या निवृत्तीनंतर प्रथम सचिन तेंडुलकरने नंतर सौरव गांगुली, विराट कोहलीने त्यांची परंपरा पुढे नेटाने चालवली. परंतु भारतीय क्रिकेटच्या पटलावर सुनील गावसकरच बिग बॉस आहेत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. अशा या भारतीय क्रिकेटच्या पितामहाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!









