बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक मार्केट व बेळगाव शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 व्या श्री गणेश ग्रामीण विभागासाठी मर्यादीत शरीरसौष्ठव स्पर्धेत पॅलीहॅड्रोजनच्या सुनील भातकांडेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर श्री गणेश हा मानाचा किताब पटकाविला. रामनाथ मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या बेळगाव ग्रामीणस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगाव ग्रामीण भागातुन जवळपास 50 हून अधिक शरीरसौष्ठव या स्पर्धेत भाग घेतला होता.या स्पर्धेचे उद्घाटन प्रंसगी निवृत्त कर्नल दिपक गुरंग, उद्योजक शिरीश गोगटे, संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, चंद्रकांत दोरकाडी, डीसीपी नारायण भरमणी, एसीपी कट्टीमनी, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल आदी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व गणेशपूजन करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
60 किलो गट : 1)आकाश जोगणे (मेणसे फिट), 2) तुषार गावडे (फिटनेस वर्ल्ड), 3)राजकुमार मोरे (मुचंडी), 4)शुभम चौगुले (फिट प्रो), 5) आदर्श कल्लेहोळ्ळकर (फिट प्रो), 65 किलो वजनी गट : 1) गजानन पाटील (फिट प्रो), 2) अफताब किल्लेदार (गोल्ड लाईट), 3)वृषभ गोणकर (आयुष), 4) साईनाथ नार्वेकर (प्लॅक्स झोन), 5) झुबेर माचीकर (गोल्डएफ), 70 किलो गट : 1)नितेश गोरल (पॉलिहॅड्रोन), 2)रोनक गवस (बॉर्नआऊट), 3)यश भोसले (गोल्डन जिम), 4) योगेश बडगावी (अनफिटनेस मुचंडी), 5) रितेश हनमतांचे (मथंन), 70 वरील गट : 1)सुनील भातकांडे (पॉलिहॅड्रोन), 2) अमर गुरव (फिटनेश फॉर्च), 3) मनीश सुतार (बेळगावकर फीट), 4)ऋतिक पाटील (भैरूफीट), 5)आकाश लोहार (गणेश) यांनी विजेतेपद पटकाविले.
गणेश श्री ग्रामीण किताबासाठी आकाश जोगाणी, गजानन पाटील, नितेश गोरल, सुनील भातकांडे यांच्यात लढत झाली.यामध्ये आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर पॉलिहॅड्रोनच्या सुनील भातकांडेने गणेश श्री ग्रामीण हा मानाचा किताब पटकाविला. मान्यवरांच्याहस्ते त्याला मानाचा किताब, चषक, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी विजय जाधव, राकेश कलघटगी, किरण वाल्मिकी व गणेशोत्सव मंडळ व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.









