बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिर्डींग संघटना व मेणसे फिटनेस यांच्यासंयुक्त विद्यमाने बेळगाव ग्रामीण येळ्ळूर क्लासीक स्पर्धेत होनग्याच्या सुनील भातकांडेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर येळ्ळूर क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. आयबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार खालील वाजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
निकाल पुढील प्रमाणे…
- 55 किलो गट : 1) शुभम चौगुले, 2) राजू मुचंडी-पिरनवाडी, 3) राजकुमार मोटरे-मुचंडी, 4) ओमकार गवस-मच्छे, 5) शुभम मुतगेकर-किणये
- 60 किलो गट : 1) साईनाथ नार्वेकर-निट्टूर, 2) योगेश बाडगवी-खनगाव, 3) साहील पाटील-येळ्ळूर, 4) श्रीशव मोतगेकर-निलजी, 5) तुषार गावडे-हिंडलगा
- 65 किलो गट : 1) नितेश गोरल-येळ्ळूर, 2) गजानन पाटील-किणये, 3) रितेश हणमंताचे-हलगा, 4) रोनक गवस-मच्छे, 5) चैतन पेडणेकर-येळ्ळूर
- 70 किलो गट : 1) सुनील भातकांडे-होनगा, 2) मोरेश देसाई-मच्छे, 3) सुहास हुंदरे-मच्छे, 4) अंकित पाटील-येळ्ळूर, 5) शाम राजगोळकर-मच्छे
- 70 वरील किलो गट : 1) अमर गुरव-देसूर, 2) रोहन केसरकर, 3) गजानन गावडे-मच्छे हे विजयी झाले.
यामध्ये येळ्ळूर क्लासिकसाठी सुनील भातकांडे, शुभम चौगुले, साईनाथ नार्वेकर, नितेश गोरल यांच्यात लढत तुलनात्मक लढत झाली. यामध्ये सुनील भातकांडेने येळ्ळूर क्लासीक हा किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून अजित सिद्दन्नावर,प्रकाश पुजारी, बंडू मजुकर, हेमंत हावळ, एन. गंगाधर,बसवराज अरळीमट्टी, नूर मुल्ला, अनंत लंगरकांडे, सुनील पवार,आकाश हुलीयार यांनी काम पाहिले तर स्टेज मार्शल म्हणून गजानन हंगीरगेकर, मयुर मेणसे, सुनील राऊत, उमेश सांबरेकर यांनी परिश्रम घेतले.









