बेळगाव : मच्छे येथे बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना मच्छे श्री बेळगाव ग्रामीण विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेत होनग्याच्या सुनील भातकांडेने आपल्या पीळदार शरीराच्या जोरावर मच्छे श्री हा मानाचा किताब पटकाविला. तर उत्कृष्ट पोझर प्रशांत मिराशी कंग्राळी याला देऊन गौरविले. मच्छे येथील या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा पंचायत माजी अध्यक्ष रमेश गोरल, डॉ. पद्मराज, डॉ. ऋतुराज चौगुले, किशोर गवस, कृष्णा जैनोजी, एकनाथ कलखांबकर, एम. गंगाधर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून केले. या स्पर्धेत ग्रामीण विभागातील जवळपास 75 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाणे – 55 किलो गट- 1. सागर चौगुले बसरीकट्टी, 2. शुभम चौगुले मच्छे, 3. श्रीशिव मोदगेकर निलजी, 4. प्रशांत मिरशी अतवाड, 5. ऋतिक पाच्छापूर यरमाळ, 60 किलो गट – 1. गजानन गावडे मच्छे, 2. रोनंक गवस मच्छे, 3. मंजुनाथ कलघटगी खानापूर 4. योगेश भडगावी कंग्राळी के. एच., 5. ज्ञानेश्वर वाणी मच्छे, 65 किलो गट – 1. विशाल निलजकर बाळेकुंद्री, 2. नितीश गोरल येळ्ळूर, 3. श्रवण लाड धामणे, 4. विशाल भोसले होनगा, 5. आदर्श कल्लेहोळकर पिरनवाडी, 65 वरील गट – 1. सुनील भातकांडे होनगा, 2. ऋतिक पाटील बेळगुंदी, 3. सुजीत शिंदे, बेळगुंदी 4. मंदार देसाई कंग्राळी के. एच. 5. पवन सावंत गणेशपूर यांनी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेवेळी एमएलआयआरसीचा शरीरसौष्ठवपटू प्रशांत खन्नूकर याने आपल्या पिळदार शरीराची प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.
त्यानंतर मच्छे श्री किताबासाठी सागर चौगुले बसरीकट्टी, गजानन गावडे, विशाल निलजकर, सुनील भातकांडे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये सुनील भातकांडेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मच्छे श्री हा मानाचा किताब पटकाविला. तर कंग्राळीच्या प्रशांत मिराशीने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. स्पर्धेनंतर रमेश गोरल, डॉ. पद्मराज, डॉ. ऋतुराज चौगुले, किशोर गवस, कृष्णा जैनोजी, एकनाथ कलखांबकर, एम. गंगाधर यांच्या हस्ते विजेत्या सुनील भातकांडेला मानाचा किताब, आकर्षक चषक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट पोझरला रोख रक्कम व चषक देऊन गौरविले. स्पर्धेसाठी पंच म्हणून एम. गंगाधर, हेमंत हवळ, आनंत लंगरकांडे, सुनील राऊत, आकाश हुलीयार, प्रशांत सुगंधी, सुनील अष्टेकर यांनी काम पाहिले.









