खेलो इंडिया स्पर्धेसाठी बिहारला होणार रवाना
बेळगाव : गया बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी बेळगाच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटू समृध्दी हलकारे व सुनीधी हलकारे यांची कर्नाटक संघात निवड झाली आहे. गया बिहार येथे 5 मे 9 दरम्यान होणऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स जलतरण स्पर्धा स्पर्धेत कर्नाटक संघात समृध्दी सुहास हलकारे व सुनिधी हलकारे यांची निवड झाली आहे. समृध्दीने 100 व 200 मी.बॅकस्कोक प्रकारात तर सुनिधी हलकारेने 200 व 400 मी. फ्रीस्टाईल प्रकारात राज्यस्थरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांची निवड झाली आहे.समृध्दी ही रविद्रनाथ टागोर पीयुसी कॉलेज तर सुनिधी ही ज्ञान प्र्र्राबोधन मंदिरची विद्यार्थीनी आहेत. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर, विनायक आंबेवाडीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अलिकडे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये स्विमर्स आणि अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी चांगली कामगिरी केली आहे.









