वृत्तसंस्था / मुंबई
बाजारातील नियामक सेबीने सुंदररमण राममूर्ती यांच्या व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओपदीच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला आहे. सोमवारी यासंबंधीची मंजुरी सेबीने दिली असल्याची माहिती आहे.
बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अध्यक्षपद(सीईओ) व व्यवस्थापकीय संचालकपद सुंदररमण राममूर्ती हे भुषविणार आहेत. याआधी या पदावर आशीषकुमार चौहान हे कार्यरत होते. चार महिन्यापूर्वी 25 जुलै रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. अखेर सेबीने वरीलप्रमाणे राममूर्ती यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
अल्पपरिचय..
62 वर्षीय राममूर्ती यांचा हा दुसरा कार्यकाळ असणार असून गेल्या 20 वर्षापासून ते एनएसई(नॅशनल स्टॉक एक्सचेंज) मध्ये काम करत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार आशिष यांनी 2002 च्या सुमारास एनएसई सोडले होते तेव्हा सुंदररमण यांना ही जबाबदारी पार पाडावी लागली. पण आता पुन्हा त्यांना बीएसईची धुरा सांभाळायला मिळते आहे.









