Google आणि Alphabet चे CEO सुंदर पिचाई (Sunder Pichai ) यांनी आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. “सर्वांसाठी उपयुक्त, खुले आणि कनेक्टेड इंटरनेट” देण्यासाठी भारताला G20 अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. भारतीय- अमेरिकन व्यापारी मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचाई यांच्या भेटीचा क्षण ट्विट केला आहे.
“PM @narendramodi यांच्या आजच्या भेटीबद्दल धन्यवाद. हि भेट तुमच्या नेतृत्वाखाली तांत्रिक बदलांचा वेग पाहण्यासाठी खुपच प्रेरणादायी आहे. आपली मजबूत भागीदारी कायम राहण्यासाठी तसेच सर्वांसाठी उपयोगी ठरणारे खुले आणि कनेक्टेड इंटरनेटचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी भारताच्या G20 अध्यक्षांना पाठिंबा देण्यास आम्ही उत्सुक आहे.” असे गुगलचे भारतीय मुळ असलेले सीईओ डॉ. सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे.
सुंदर पिचाई भारत दौऱ्यावर असून त्यांनी आदल्या दिवशी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत Google for India 2022 या कार्यक्रमात भाग घेतला. या मंचावर त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यात Google चा वापर या गोष्टींवर भाष्य केले. ते म्हणाले “आम्ही गुगलच्या भाषांची संख्या वाढवण्यासाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचा (AI) चा वापर करत आहोत. अलीकडेच आसामी, भोजपुरी, कोकणी यासारख्या नऊ भारतीय भाषा वाढवल्या आहेत.” असे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









